अहमदनगर : भाजपा जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशाच्या कोर्टात

 
 एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील भाजप च्यावतीने  दक्षिण,  उत्तर व नगर शहर या तीन विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आज शुक्रवारी कोहिनूर मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व संघटन मंत्री किशोर काळकर यांनी मुलाखती घेतल्या असून तिन्ही जिल्हाध्यक्षाची घोषणा प्रदेश पातळीवरून होतील, असे बागडे यांनी स्पष्ट केले आहे. 
 
दक्षिणेतून 17,  उत्तरेतून 14 व नगर शहरामधून ७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. एकूण 38 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. चर्चेत असणारे माजी आमदार शिवाजीराजे कर्डीले यांनी मात्र नगर दक्षिणेतून मुलाखत दिली नाही. त्यामुळे दक्षिणेचा जिल्हाध्यक्ष कोण होणार याबाब चर्चेला उधाण आले आहे.

उत्तरे मधून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुलाखत दिली आहे, तर नगर शहरांमधून माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मुलाखत दिली आहे. त्यामुळे दक्षिणेसाठी दक्षिण उत्तर व नगर शहरासाठी कोण जिल्हाध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post