एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग क्र.6 अ या एका जागेसाठी 6 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत असून या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.14) पासून सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिवीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.14 ते दि.21 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जुन्या महापालिका इमारतीतील प्रभाग समिती क्र.2 च्या कार्यालयात चालणार आहे. दि.22 रोजी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. छाननी पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दि.25 रोजी सकाळी 11 वाजेपासून उमेदवारांनी चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्याच दिवशी अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यक असल्यास 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी दि.7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे.
या पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणीसाठी कक्ष प्रमुख म्हणून लेखाधिकारी महेश कावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याबरोबरच ऑफलाईन अर्जही दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Post a Comment