एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेच्या 'प्रभाग ६ अ'च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भारतीय जनता पार्टी कडून वर्षा रोहन सानप व पल्लवी दत्तात्रय जाधव असे दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टी कडून वर्षा रोहन सानप यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. मात्र, मतदार यादीतील नावासंदर्भात सानप यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जाबाबत कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून पल्लवी दत्तात्रय जाधव यांचे नाव एबी फॉर्म वर देण्यात आले आहे. दोघांपैकी भाजपचा उमेदवार कोण हे छाननीवेळीच स्पष्ट होणार आहे.
Post a Comment