स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनीही सहभागी व्हावे; महापालिका कामगार यूनियनचे आवाहन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : ओडीएफ++ चे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता केंद्राचे पथक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सर्वेक्षणात यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहन महापालिका कामगार यूनियनने केले आहे. महापालिकेचे सफाई कामगारच नव्हे तर इतर सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी, यूनियनचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियान राबवत आहेत. नागरिकांनीही वैयक्तित पातळीवर शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत, स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहनही यूनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. महापालिकेला ओडीएफ+चा दर्जा यापूर्वीच मिळालेला आहे. तसेच स्वच्छतेत वन स्टार मानांकन यापूर्वीच मिळालेले आहे. आता थ्री स्टार रॅंकींगसाठी मनपा सर्वेक्षणात सहभागी झाली आहे. या अंतर्गत "नागरीकांचा सहभाग" या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक शहरात आले आहे. नागरिकांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे. शहर स्वच्छतेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शानाखाली महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांची साथ आवश्यक आहे. नागरिकांनीही स्वच्छतेसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन युनियनाच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरीकांना विचारण्यात येणारे सात प्रश्न व अपेक्षित उत्तरे :

प्रश्न क्र.१ : तुमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे, हे आपणास माहित आहे का?
उत्तर : होय. आमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी आहे.

प्रश्न क्र.२ : तुमच्या अहमदनगर शहरातील परिसर स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : होय. शहरातील परिसर स्वच्छतेस माझे गुण २०० पैकी २०० गुण.

प्रश्न क्र.३ : अहमदनगर शहरातील व्यावसायिक क्षेत्र व सार्वजनिक परिसर आता अधिक स्वच्छ, सुंदर व हरितसाठी २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : होय. शहरातील व्यवसायिक व सार्वजनिक परिसर स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.

प्रश्न क्र.४ : अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कर्मचारी तुम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात का?
उत्तर : होय. महानगरपालिकेमार्फत कर्मचारी आम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात.

प्रश्न क्र.५ : तुमचे अहमदनगर शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे का?
उत्तर : होय. माझे शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे.

प्रश्न क्र.६ : तुमच्या अहमदनगर शहराने ODF + चे मानांकन मिळावले आहे का?
उत्तर : होय. माझ्या शहरास ODF + चे मानांकन मिळाले आहे.

प्रश्न क्र.७ : आपल्या अहमदनगर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.

Post a Comment

Previous Post Next Post