अहमदनगर : लांडे खून प्रकरणी संदिप व सचिन कोतकर यांना जामीन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर आणि सचिन कोतकर यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांनी आज (ता.13) जामीन मंजूर केला.

शेवगाव येथील रहिवाशी असलेला लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे यांना 19 मे 2008 रोजी केडगावमध्ये अमानूष मारहाण करून खून करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते. भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल या चौघांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती.

भानुदास कोतकर यांना उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन यांनी ही अ‍ॅड. अभय ओस्तवाल (औरंगाबाद) यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड. ओस्तवाल यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. जामीन कालावधीत जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post