सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांचे आवाहन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका कचरा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा टाकावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकू नये. तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्र साठवावा व स्वतंत्रपणेच जमा करावा, असे आवाहन सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.


जो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते. याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा असतो. ओला व सुका कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे. घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपणच निमंत्रण देत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा विलगीकरण करावे. विलगीकरण केल्यास कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागण्यासाठी उपयोग होईल. प्रभागात स्वच्छता रहावी, यासाठी सर्वांनीच स्वच्छता अभियान सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

तसेच, सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. या अंतर्गत "नागरीकांचा सहभाग" या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात सात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरीकांना विचारण्यात येणारे सात प्रश्न व अपेक्षित उत्तरे :

प्रश्न क्र.१ : तुमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे, हे आपणास माहित आहे का?
उत्तर : होय. आमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी आहे.

प्रश्न क्र.२ : तुमच्या अहमदनगर शहरातील परिसर स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : होय. शहरातील परिसर स्वच्छतेस माझे गुण २०० पैकी २०० गुण.

प्रश्न क्र.३ : अहमदनगर शहरातील व्यावसायिक क्षेत्र व सार्वजनिक परिसर आता अधिक स्वच्छ, सुंदर व हरितसाठी २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : होय. शहरातील व्यवसायिक व सार्वजनिक परिसर स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.

प्रश्न क्र.४ : अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कर्मचारी तुम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात का?
उत्तर : होय. महानगरपालिकेमार्फत कर्मचारी आम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात.

प्रश्न क्र.५ : तुमचे अहमदनगर शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे का?
उत्तर : होय. माझे शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे.

प्रश्न क्र.६ : तुमच्या अहमदनगर शहराने ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळावले आहे का?
उत्तर : होय. माझ्या शहरास ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळाले आहे.

प्रश्न क्र.७ : आपल्या अहमदनगर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार?
उत्तर : सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.

Post a Comment

Previous Post Next Post