अहमदनगर : देवेंद्र फडणवीस यांची नगरला धावती भेट; पदाधिकार्‍यांशी बंद खोलीत चर्चा


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.11) नगर येथील शासकीय विश्रामगृहावर स्थानिक पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काही निवडक पदाधिकार्‍यांशी बंद खोलीत चर्चा केली.
देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे जाताना नगरला धावती भेट दिली. यावेळी आ.बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगरसेवक भैय्या गंधे, सचिन पारखी, सुनील रामदासी, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, किशोर बोरा आदी उपस्थित होते. भाजपाच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
फडणवीस यांनी काही निवडक पदाधिकार्‍यांशी बंद खोलीत चर्चा केली. जिल्ह्यातील संघटनात्मक निवडणुका व जिल्हाध्यक्ष निवडीबाबत त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. गांधी, बेरड, पाचपुते, मुरकुटे, गंधे, पारखी आदींशी त्यांनी एकत्रित चर्चा केल्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीच्या निर्णयाबाबत चर्चांना उधाण आले आहे. पदाधिकार्‍यांनी मात्र बैठकीतील चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला असून, निवडींबाबत चर्चा झाली नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईल, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

Post a Comment

Previous Post Next Post