एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर शहरात तलवार बाळगणार्या दोघांना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सोमवारी (दि.13) रात्री पकडले आहे. त्यांच्याकडून दोन तलवारींसह 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलवार बाळगणारा आरोपी मोहन संजय रोकडे (वय 27, रा.लालटाकी झोपडपट्टी) यास लालटाकी येथील शिवम् मेडीकल समोर रात्री 9.20 वाजता पकडण्यात आले. तर दुसरा आरोपी अमित कैलास चव्हाण (वय 35, रा.म्युनिसिपल कॉलनी, सिद्धार्थनगर हल्ली मु. मोमीन गल्ली भिंगार) यास रात्री 10.30 च्या सुमारास अपुहत्ती चौकाती बेटर होम फर्निचर समोर पकडण्यात आले. या दोघांकडून दोन तलवारी तसेच 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सुयोग सुपेकर, महेश मगर, बाबासाहेब फसले, सागर द्वारके, गणेश चव्हाण, बाळासाहेब मासाळकर, राजेंद्र जायभाय, गोरख घोलप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment