अवजड वाहतूक : वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरून भरदिवसा सुरु असलेली अवजड वाहतूक.

एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : शहरात सर्रास सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे मागील आठवड्यात दोन नागरिकांचा बळी गेला आहे. शहर वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत आहे. अवजड वाहतुकीबाबत तातडीने निर्णय घेऊन शहरातून जड वाहनांना प्रतिबंध करावा, शहरात अवजड वाहने आढळून आल्यास वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणी सुर्या फाउंडेशनचे अध्यक्ष काका शेळके यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वे उड्डाणपुलावर बस व ट्रकचा अपघात झाला. यात तीघांचा बळी गेला. पत्रकार चौकात व रंगोली हॉटेलसमोर अवजड वाहतुकीमुळे दोघांचा बळी गेला. अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले असतांनाही शहर वाहतूक शाखेकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. सुर्या फाउंडेशनच्या वतीने अवजड वाहने पकडून दिली जाणार आहेत. त्यांच्या कारवाई करावी. तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांवरही कारवाई करुन त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post