एएमसी मिरर वेब टीम
औरंगाबाद : पैठण- औरंगाबाद रस्त्यावर इसारवाडी गावाजवळ आज पहाटे चारच्या सुमारास चारचाकी व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात बाळासाहेब डाके (वय ४५ , रा. ढोरजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर) व पत्नी अंबिका डाके (वय ४०) तसेच सासू सुमन नरोडे (वय ६५ ) यांचा जागीच मृत्यू झाला.
बाळासाहेब डाके हे पत्नीला दवाखान्यात घेवून औरंगाबादला चालले होते. अपघात एवढा भीषण होता की, चारचाकीचा चुराडा झाला होता. या अपघातात कंटेनरच्या खाली गाडी घुसल्याने गाडीला तोडून बाहेर काढावे लागले.
अपघाताची बातमी मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन शासकीय रुग्णालय पैठण येथे दाखल केले आहे. मृताचा भाऊ देविदास डाकेच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एक जण फरार असून एकास अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
Post a Comment