मराठी साहित्यिकांना कर्नाटक बंदी


एएमसी मिरर वेब टीम 
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा फटका साहित्यिकांनाही बसला आहे. सीमाभागात होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणाऱ्या मराठी साहित्यिकांनी पोलिसांनीच प्रवेश नाकारला आहे. कर्नाटकातील खानापूर तालुक्यात असलेल्या इदलहोड येथे गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याआधीच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर मराठी साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे.

इदलहोडमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून मराठी साहित्यिक जाणार होते. पण, संमेलनाआधीच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कर्नाटक पोलिसांनीच साहित्यिकांना प्रवेश नाकारला आहे.

“कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध”
या निर्णयाचा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी निषेध केला आहे. मराठी साहित्यिकांना कर्नाटकमधील एका मराठी साहित्य संमेलनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कर्नाटक पोलिसांनी पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले. महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा खात्याचा मंत्री या नात्याने कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post