भाजपचे नगर शहरातील मंडलाध्यक्ष जाहीर; शिंदे, चितळे, जहागिरदार यांना संधी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदांच्या निवडणूकीचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. शुक्रवार दि.10 जानेवारी रोजी शहर जिल्हाध्यक्ष, दक्षिण व उत्तर या ग्रामीण जिल्हाध्यांची निवड होणार आहे. तत्पूर्वी शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहरातील तीन मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यात केडगांव मंडल अध्यक्षपदी पंकज जहागिरदार, मध्यमंडल अध्यक्षपदी अजय चितळे व सावेडी मंडल अध्यक्षपदी सतीश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, किशोर डागवाले, निवडणुक निर्णय अधिकारी चेतन जग्गी, नरेंद्र कुलकर्णी, श्रीकांत साठे, कालिंदी केसकर, संगीता खरमाळे, संजय ढोणे, सुवेंद्र गांधी, जगन्नाथ निंबाळकर, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सावेडी मंडलच्या संघटन सरचिटणीसपदी अमित गटणे तसेच मध्यनगर संघटन सरचिटणीसपदी प्रशांत मुथा यांच्याही नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

यावेळी केडगांव मंडल अध्यक्षपदासाठी पंकज जहागिरदार यांच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष शरद ठुबे यांनी मांडली, त्यास धनंजय जामगावकर यांनी अनुमोदन दिले. मध्य मंडल अध्यक्षपदासाठी अजय चितळे यांच्या नावाची सूचना मावळते मंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केली, त्यास विराज गांधी यांनी अनुमोदन दिले. तसेच सावेडी मंडल अध्यक्षपदासाठी सतीश शिंदे यांच्या नावाची नितीन शेलार यांनी सूचना मांडली, त्यास किशोर वाकळे यांनी अनुमोदन दिले. नवनियुक्त तीन्ही मंडलच्या अध्यक्षांचा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी सत्कार करुन अभिनंदन केले.

दिलीप गांधी म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे. नगर शहराचा अध्यक्ष म्हणून गेल्या 4 वर्षांपासून काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करता आले. याच काळात भाजपाची महापालिकेत सत्ता येणे, लोकसभेचा खासदार पुन्हा भाजपाच होणे हे यश मिळाले आहे. आता लोकशाही पद्धतीने भाजपाच्या पक्षांतर्गत निवडणुका होत आहेत. अत्यंत पारदर्शी पद्धतीने सर्वांना विश्‍वासात घेऊन शहरामधील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मावळत्या मंडल अध्यक्षांनी चांगले काम केले आहे. आता नवनियुक्त मंडल अध्यक्षही अधिक चांगले काम करुन शहरातपक्षाचे काम वाढवतील, असा विश्‍वास वाटतो. शहरात भाजपाचे काम आणखी वाढावे, यासाठी लवकरच सावेडी उपनगरात उपकार्यालय सुरु करणार असून, यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सरचिटणीस किशोर बोरा यांनी प्रास्तविक केले. तर आभार प्रा.सुनिल पंडित यांनी मानले. यावेळी अन्वर खान, नगरसेवक भैय्या गंधे, सावेडी मंडल माजी अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कुसूम शेलार, शाकिर सय्यद, वाहिद कुरेशी, पुष्पर कुलकर्णी, रोशन गांधी, लक्ष्मीकांत तिवारी, पियुष संचेती, गोपाल वर्मा, किशोर कटोरे, राजू वाडेकर, नितीन जोशी, मनेष साठे, भरत ठुबे, महेश हेडा, कैलास गर्जे, भरत सुरतवाला, अभिषेक शिंदे, अमोल निस्ताने, साहिल शेख, नरेश चव्हाण, आनंद शेलार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post