भाजप जिल्हाध्यक्षांच्या शुक्रवारी निवडी; माजी सभापती हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत नगरमध्ये बैठक


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.10) दुपारी विधानसभेचे माजी सभापती व निवडणूक अधिकारी हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशा तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी दिली आहे.
मंगळवारी (दि.7) भाजपच्या नगर जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष बेरड यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, आ.मोनीका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तसेच मंडलाध्यक्षांच्या निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या.

सात मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर
संगमनेर शहर - राजेंंद्र सांगळे, संगमनेर ग्रामीण - डॉ.अशोक इथापे, कोपरगांव ग्रामीण - साहेबराव रोहम, नेवासा - नितीन दिनकर, शेवगाव - ताराचंद लोंढे, पाथर्डी - माणिक खेडकर, राहुरी - अमोल भनगडे आदींच्या निवडी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांनी जाहीर केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post