हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही : धनंजय मुंडे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधी पक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकासआघआडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी भाजपाला दिला आहे.

धनंजय मुंडे याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते राजीव सातव, राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर जोरादार टीका केली आहे. शिवाय, या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून भाजापाने माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post