नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आठवलेंविरोधात खटला दाखल


एएमसी मिरर वेब टीम 
रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात झारखंड मधील रांचीतील कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयातील एका वकीलाने हा खटला दाखल केला असून यात निवडणुक प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पू्र्ण न करुन मोदी, शहा आणि आठवले यांनी जनतेची फसवणूक व दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारीला होणार आहे.

झारखंड उच्च न्यायालयाचे वकील हरेंद्र कुमार सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायिक दंडाधिकारी अजय कुमार गुड़िया यांनी पुढील सुनावणी 1 फेब्रुवारीला होईल असे सांगितले.

तक्रार पत्रात तक्रारदाराने 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा आणणार असे आश्वासन दिले होते. तसेच तो पैसा जनतेच्या खात्यात प्रती 15 लाख रुपयांप्रमाणे जमा करेन, दरवर्षी तीन लाख सरकारी नोकऱ्या देईन अशीही आश्वासन जनतेला जाहीरनाम्यातून दिली होती. हीच आश्वासन मोदी यांनी 2013 साली छत्तीसगडमध्येही दिली. त्यांच्या या आश्वासनांवर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मत दिली व भाजपला बहुमत मिळाले. हाच जुमला अमित शहा यांनीही वापरला. एका वृत्तवाहीनीला 5 फेब्रुवारी 2015 साली दिलेल्या मुलाखतीत देशवासियाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन हे निवडणुकीच्या पार्श्भूमीवरच दिल्याचे सांगितले होते. शहा यांच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली होती.

तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही 18 डिसेंबर 2018 मध्ये काळा पैसा देशात आल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये जमा करणाऱ असल्याच्या पंतप्रधानांच्या आश्वासनाचा सांगलीत पुर्नरुच्चार केला होता. पण सत्तेवर आल्यावर भाजपला आश्वासनांचा विसर पडला. पंधऱा लाख रुपयांच्या मुद्दयावर त्यांनी घूमजाव केले व जनतेची फसवणूक केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच माहितीच्या अधिकारात याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता माहितीच्या अधिकाराच्या अखत्यारित ते येत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रत्येक देशवासियाला आपली फसवणूक झाल्याचे वाटू लागले आहे. असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post