मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर येत आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचे शहरात आगमन होणार असून मसिआच्या वतीने आयोजित ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संभाजीनगरात येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे सकाळी 10.45 वाजता विमानाने आगमन होणार असून शिवसेनेच्या वतीने विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.

‘महाएक्स्पो’च्या उद्घाटनानंतर विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धाराशीव, संभाजीनगर, परभणी जिल्हय़ातील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असून संभाजीनगर महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱयांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ते लातूर जिल्हय़ाचा आढावा घेतील. त्यानंतर मराठवाडय़ात झालेला अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना देण्यात येत असलेल्या मदतीचा आढावा घेतील.

Post a Comment

Previous Post Next Post