सीएएविरोधात विजयन यांचे 11 मुख्यमंत्र्यांना पत्र


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता कायम अबाधित राखण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणारा ठराव त्यांनी विधानसभेत मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वाचवण्याबाबत आवाहन केले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातून संताप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाला अखंड ठेवण्यासाठी काम करण्याची वेळ आली आहे, असे पिनराई विजयन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. केरळ सरकारने सीएए रद्द करावा अशी मागणी करत त्याला विरोध करणारा ठराव विधानसभेत बहुमताने मंजूर केला आहे. यावेळी सत्तधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, डावी लोकशाही आघाडीसह विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने सीएएविरोधातील ठरावाला पाठिंबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post