निर्भया प्रकरणातील गुन्हेगारानं जीव वाचवण्यासाठी केली अंतिम याचिका


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी कायम ठेवण्याचा निकाल दिल्ली न्यायालयाने दिला होता. २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच, या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी न्यायालयानं दिला होता.

निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यानं २२ जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.

काय आहे निर्भया प्रकरण?
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

काय असतं डेथ वॉरंट?
कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं की कोर्टाला फाशीची तारीख आणि वेळ जाहीर करावी लागते. तसेच मधला काही काळ हा आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी भेटावं म्हणून दिलेला असतो. तसंच काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तरीही हा वेळ दिला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post