जैसी करनी वैसी भरनी; मुनगंटीवारांचं सुचक वक्तव्य


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपानं कोणत्याही प्रकारची फुस लावल्याचा आरोप चुकीचा आहे. जैसी करनी वैसी भरनी असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

महाविकास आघाडीचं लक्ष केवळ खुर्चीवर आहे. खातेवाटपावरूनही महाविकास आघाडीत भांडण सुरू होतं, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी सत्तेसाठी कोणतेही निर्णय घेत सरकार स्थापन केलं त्या ठिकाणी असंच होणार, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील असं सूचक वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं.

Post a Comment

Previous Post Next Post