चंदा कोचर यांच्या मुंबईतल्या घरासह ७८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांच्या मुंबईतलं घर, त्यांच्या पतीचे ७८ कोटींचे मूल्य असलेले शेअर्स या सगळ्यावर ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने टाच आणली आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

चंदा कोचर यांच्या घरासह एकूण ७८ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केल्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यू पॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम एनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. २००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. आता या सगळ्या प्रकरणी चंदा कोचर यांच्या घरासह एकूण ७८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post