खातेवाटप न झाल्यानं उघड नाराजी : हरिभाऊ बागडे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सराकारचं खातेवाटप झालं नाही. त्यामुळे आता नाराजी उघडपणे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.

प्रसारमाध्यमांतूनच सत्तार यांच्या राजीनाम्याची माहिती मिळाली. त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप माहित नाही. औरंगाबादमध्येही अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जो संघर्ष सुरू आहे, त्याचा हा परिणाम आहे. सत्तार हे राज्यमंत्रिपद मिळाल्यानं नाराज होते. त्यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. त्यामुळे ते मंत्रिमंडळातच राहतील, असं वाटत असल्याचंही बागडे म्हणाले. अशा गोष्टींचा सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. राज्य सरकारच्या खात्यांचं अद्यापही वाटप झालं नाही. हा नाराजीचा परिणाम आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Post a Comment

Previous Post Next Post