एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : जानेवारीच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात दरवाढ सुरू होती आणि सोन्याचा भाव विक्रमी स्तरावर गेला होता. मात्र गेल्या आठवडाभरात यात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र आता सोन्याची झळाळी कमी होऊ लागली असून एका आठवड्यात तोळ्यामागे तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
अमेरिकेने इराणच्या टॉप कमांडरला क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार केल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला होता. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (8 जानेवारी) सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ होऊन ते 42 हजारांच्याही पार गेले होते. परंतु आता अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होताना दिसत असल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे.
आठवड्याभरामध्ये सोन्याच्या किंमती तोळ्यामागे 2 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. मंगळवारी सोन्याचा भाव 39, 328 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर प्रतितोळा 42080 रुपये होते. सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून चांदीचा प्रतिकिलोचा भाव 46,060 रुपये झाला आहे.
Post a Comment