मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकून दोन मुलींची सुटका केली आहे तर दोन तरुणींना अटक केली आहे. विशेष म्हणजे रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या दोन तरुणी मॉडेल आणि अभिनेत्री आहेत.

मुंबई पोलिसांच्या एका स्पेशल टीमने गुरुवारी रात्री गोरेगावमधील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही टीव्ही अभिनेत्री, मॉडेल्स आणि बॉलिवूडशी संबंधित काही तरुणी या भागात सेक्स रॅकेट चालवत आहेत, तसेच हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरवतात.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. यामध्ये त्यांनी दोन तरुणींना पकडले. एक तरुणी पेशाने अभिनेत्री आहे तर दुसरी मॉडेल आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंह अशी पकडलेल्या दोन्ही तरुणींची नावं आहेत. या दोन्ही तरुणी बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या.

फिल्मी स्टाईल रेड
या रॅकेटला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्मी स्टाईल धाड टाकली. पोलिसांनी त्यांच्याच एका व्यक्तीला कस्टमर सेक्स रॅकेटशी संबंधित तरुणींशी संपर्क साधायला लावला. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये पाठवले. हॉटेलमध्ये दोन्ही तरुणी पोलिसांनी पाठवलेल्या त्या व्यक्तीला भेटल्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अमृता धनोआ आणि रिचा सिंह या दोघींना अटक केली.

पोलीस उपअधीक्षक स्वामी यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये त्यांनी दोन तरुणींची सुटका केली आहे, तर दोन तरुणींना (अमृता धनोआ आणि रिचा सिंह)अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी तरुणींवर आयपीसीच्या कलम 370 (3) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रिवेन्शन ऑफ इम्मॉरल ट्रॅफिकिंग अॅक्टच्या कलम 4 आणि 5 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post