एएमसी मिरर वेब टीम
बगदाद : इराणचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराकमध्ये सुलेमानी यांना ड्रोन हल्ला करत ठार मारले होते. याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी इराकमधल्या अमेरिकेच्या सैनिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेचा सूर नरमलेला वाटत होता. गुरुवारी इराणने पुन्हा एकदा हल्ला केला असून त्यांनी आता इराकमधील अमेरिकेच्या दूतावासा लक्ष्य केले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकेने ड्रोन हल्ला करत सुलेमानी यांना ठार केल्याने इराणला जबर धक्का बसला आहे. याचा सूड म्हणून इराणने इराकमधील अमेरिकन सैन्याच्या तळावर रॉकेट हल्ला केला होता. यात 80 जण ठार झाल्याचा दावा इराणने केला आहे. हा हल्ला ट्रम्प यांना चांगलाच झोंबला आहे. अमेरिका इराणवर हल्ला करेल असं वाटत होतं मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवर प्रतिहल्ला करण्याचे टाळत इराणवर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळेही इराण चवताळला असून त्याने इराकची राजधानी बगदाद मथील अमेरिकेच्या दूतावासावर दोन क्षेपणास्त्रे सोडली.
Post a Comment