एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसचार मागे डाव्या संघटनाचं पूर्वनियोजन असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
आज पोलिसांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, मागील पाच दिवसांपासून जे अभाविप व भाजपाविरोधात आरोप लावले जात होते, ते खोटे आहेत. ही जाणीवपूर्वक केलेलं पूर्वनियोजन होत. या डाव्या संघटनांनीच हिंसाचाराचा कट रचला होता, सीसीटीव्ही आणि सर्व्हर नष्ट केले होते. असं जावेडकर यांनी म्हटलं आहे.
जेएनयू मध्ये झालेल्या हल्ल्यातील अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली आहे, असं दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही फोटोही पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. तसेच आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही, मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या आइशी घोषसह दहा जणांवर या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.
Post a Comment