झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना अटक


एएमसी मिरर वेब टीम 
पालम : झारखंड येथील पालमू जिल्ह्यातील शनिवारी पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या सरकाच्या शपथविधी सोहळ्याअगोदर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. नक्षलवाद्यांनी एक इमारतच स्फोटकांनी उद्धवस्त केली होती.

या अगोदर झारखंडमधील निवडणुकीदरम्यान देखील नक्षलवाद्यांनी हल्ला घडवला होता. येथील बिनशपूरमध्ये नक्षलवाद्यांनी एक पूल उद्धवस्त केला होता. तसेच, लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले होते. तर, एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post