मकरसक्रांतीला पतंग उडवा, पण जरा जपून!


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : मकरसंक्रातीला सर्वांना तिळगुळासह पतंग उडवण्याचे वेध लागतात. पतंग आणि मांजा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये याकरिता सर्व संक्रांतप्रेमींनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मकरसंक्रांतीला अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा होतात. मात्र, पतंग उडवताना काळजी घेणेही आवश्यक आहे. अन्यथा पतंग उडवणे जीवावरही बेतले जाते. उंचावरचे ठिकाण, रहदारीचा रस्ता, रेल्वे ट्रॅक आणि उच्च विद्यूत प्रवाह असणाऱ्या ठिकाणांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.


पतंग उडवताना काय काळजी घ्याल ?

पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणा पासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळा

विजेत्या तारांवर अडकलेला पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न करू नका

घरावरून विजेची तार गेली असल्यास पतंग उडवताना सावध रहा

उंचावरून पतंग उडवत असल्यास इमारतीच्या कठड्यांवर उभे राहू नका

कटलेला पतंग पकडताना रस्त्यावरून वेडेवाकडे धावू नका, आजूबाजूची वाहने पाहा

लहान मुलांच्या हातात मांजा व तत्सम गोष्टी देताना सावध रहा, मांजा धारधार असल्याने बोटे कापण्याची शक्यता असते.

चायना मांजा वापरू नका, पक्षांसाठी आणि माणसाचेही प्राण यामुळे जाऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post