राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज (दि.४) आयुर्वेद कॉलेज येथे आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, रेश्मा आठरे, मनपा गटनेता संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, कुमारसिंह वाकळे पाटील, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विपुल शेटिया, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे, बाळासाहेब बारस्कर, निर्मला मालपाणी, शारदा लगड, सुमित कुलकर्णी, विधिज्ञ प्रसन्ना जोशी, धनंजय गाडे, भरत गारुडकर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, सोमनाथ दूध, सारंग पंधाडे, अमित खामकर, किसन लोटके आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post