'लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मी स्वत: कोणतीही बातमी ऐकली नाही. मी ऐकीव बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. परंतु असं घडू शकतं हे नाकारता येत नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे, असं म्हणत खासदार गिरीष बापट यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

मी अशी बातमी ऐकली नाही. सरकारनं अद्यापही खातेवाटप केलं नाही. सत्तार यांनी का राजीनामा दिला हे माहित नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसून येतं, असं बापट यावेळी म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते. तीन पक्षांचं सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Post a Comment

Previous Post Next Post