26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ‘नाईट लाईफ’


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वाव नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासंदर्भात एक बैठक पार पडली, या बैठकीत पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात.

मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच ही संकल्पना त्यांनी मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना, पण झाला आहे. त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

…तर भाजपाचा विरोध
मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल, तर आमचा कडाडून विरोध राहिल, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post