निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच; दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर 22 जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पतियाळा हाऊस कोर्टानं दोषींना डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

Post a Comment

Previous Post Next Post