संभाजी राजेंनी उपोषण करू नये, चर्चा करून मार्ग काढण्यात येईल : उपमुख्यमंत्री


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात उद्या खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्या पूर्वी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवाराची मुलाखत घेतली गेली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.

Post a Comment

Previous Post Next Post