वीर सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा : संजय राऊत


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलाच पाहिजे. जे विरोध करत असतील त्यांना अंदमानात पाठवा असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. अंदमानात सावरकरांनी जी शिक्षा भोगली तिथे त्यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी धाडायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही विरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post