‘या’ शहरात सापडले दुसऱ्या महायुद्धातील 250 किलोचे चार जिवंत बॉम्ब!


एएमसी मिरर वेब टीम 
डॉर्टमुंड : दुसरे महायुद्ध संपून सुमारे 75 वर्षे उलटली आहेत. तरीही या युद्धातील अनेक गोष्टींमुळे आजही या महायुद्धाच्या चर्चा होत आहेत. या महायुद्धाबाबतची अनेक रहस्य आणि चकीत करणाऱ्या गोष्टी उघड होत आहेत. आता जर्मनीतील डॉर्टमुंड शहरात जमीनीखाली दुसऱ्या महायुद्धातील 250 किलोचे चार जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. या शहरात 250 किलोचे चार जिवंत बॉम्ब असल्याची बातमी वाऱ्यासारखी परसली आणि थोड्याच वेळात लोकांनी हे शहर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. आता हे बॉम्ब निकामी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जर्मनीच्या पश्चिम भागात असलेल्या डॉर्टमुंड शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील 250 किलोचे चार जिवंत बॉम्ब सापडले आहेत. जमीनीखाली जिवंत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या असून हे बॉम्ब निकामी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही बातमी शहरात पसरल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी शहर सोडून सुरक्षितस्थळी जाण्यास सुरुवात केल्याने अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याने नागरिकांना हटवण्याचे काम प्रशासनाला हाती घ्यावे लागले. जर्मनीतील अनेक शहरांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापर न केलेले अनेक जिवंत बॉम्ब सापडत आहेत. मात्र, आता सापडलेले हे बॉम्ब सर्वात जास्त वजनाचे आहेत. हे बॉम्ब जिवंत असल्याने ते सुरक्षितपणे जमीनीबाहेर काढून निकामी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. बॉम्ब निकामी करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

बॉम्ब जमीनीबाहेर काढून निकामी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असतानाच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हे बॉम्ब बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या भागातील गर्दी हटवण्याचे कामही प्रशासनाला करावे लागत आहे. तसेच या बॉम्बबाबत शहरात कोणत्याही अफवा पसरू नयेत, याचीही काळजी घेण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (1940-45) बॉम्बवर्षावासाठी जर्मनीत अनेक बॉम्ब तयार करण्यात आले होते. मात्र, त्यांचा वापर करण्यात आला नसल्याने ते जमीनीखाली गाडले गेले. आता जर्मनीतील अनेक शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका बॉम्बचा 2017 मध्ये स्फोट झाला होता. त्याचा फटका सुमारे 65 हजार नागरिकांना बसला होता. त्यामुळे असे बॉम्ब सुरक्षितपणे जमीनीबाहेर काढून निकामी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या बॉम्बचा वापर करण्यात आला असता तर प्रचंड नुकसान झाले असते, याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post