एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : जेएनयू हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप JNUSU ची अध्यक्ष आइशी घोषने केला आहे. “आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरही हिंसाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे मात्र माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझ्याकडेही माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत” असंही आइशीने म्हटलं आहे. “आम्ही काहीही चुकीचं वागलो नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या प्रश्नांचा सामना करु. दिल्ली पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवून वागत आहेत असाही आरोप आइशीने केला.
जेएनयूच्या कुलगुरूंना तातडीने पदावरुन हटवण्यात यावं अशीही मागणी यावेळी आइशी घोष आणि अमित खरे यांनी केली. या विद्यापीठाला अशा कुलगुरूंची गरज आहे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतील असंही या दोघांनी म्हटलं आहे.
Post a Comment