एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरातील गोळीबार आणि अनुराग ठाकूर यांनी केलेली वादग्रस्त घोषणाबाजी याचे पडसाद आज लोकसभेमध्ये उमटले. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज लोकसभेमध्ये भाषणासाठी उभे राहताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘गोली मारना बंद करो; देश को तोडना बंद करो’ अशी घोषणाबाजी सुरु केली.
त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. “तुम्हाला लोकांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पाठवले आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही” असे ओम बिर्ला यांनी खासदारांना सुनावले. तरीही घोषणाबाजी सुरुच होती.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी “देश के गद्दारो को, गोली मारो अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या.” त्याचेच पडसाद आज संसदेत उमटले. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.
Post a Comment