काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; चार जखमी


एएमसी मिरर वेब टीम 
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवले. श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

काश्मीर विभागीय पोलिसांच्या माहितीनुसार श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. याच तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सीमेपलिकडून वारंवार घुसखोरी केली जाते. विशेषतः दहशतवाद्यांकडून वारंवार सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्यात येते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यापासून असे प्रयत्न झाले. मात्र, लष्कारानं हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post