#CORONA : लॉकडाऊनमध्ये राहणार ‘या’ सुविधा सुरू


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : कोरोना व्हायरसचा देशात वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील 21 दिवसांपर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या दरम्यान देशात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या संदर्भातील यादी गृहराज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

काय बंद
अत्यावश्यक सेवेसाठी गृह मंत्रालयाने गाईड लाईन जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत शासकीय व खासगी कार्यालये, बस, शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत.

काय सुरु
पोलीस ठाणे, पेट्रोल पंप, गॅस सेवा, मीडिया, मेडिकल, रुग्णालये, लॅब, रुग्णवाहिका, वीज सेवा, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, मांस, मासे विक्री, बँका, एटीएम, केबल सेवा सुरु राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post