कोरोना : उद्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान उड्डाणेही बंद


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डांणाबरोबरच आता देशांतर्गत विमानसेवा बंद होणार आहे. ही विमानसेवा उद्या मंगळवारी (दि.२४) मध्यरात्रीपासून बंद केली जाणार आहे. मात्र, मालवाहू विमान उड्डाणे सुरुच राहणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अनेक कंपन्यांनी आपली शेकडो उड्डाणे बंद ठेवली. यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडणारी जवळपास ३५० उड्डाणे रद्द झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post