एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात बंदोबस्ताला असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना अन्न, फळे, पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील पोलिस कर्मचार्यांना अन्नपदार्थ, पाणी व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील रस्त्यावर राहणार्या बेघरांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांनाही फळ, पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अनिकेत गाडेकर, आनंद परमार, शिवा अनभुले, विजय जग्गी आदी उपस्थित होते. दरम्यान, बंद काळात रोजंदारीवर गुजराण करणार्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा गरजूंना किराणा साहित्य, जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.
Post a Comment