#CORONA : घराबाहेर पडू नका; स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या : उपमहापौर मालन ढोणे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, त्याचा प्रादुर्भाव रोखावा, यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण हाच एक मोठा उपाय असल्याने गर्दी टाळावी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन उपमहापौर मालन ढोणे यांनी केले आहे.
शहरात जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत. बंद काळात ही दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी करू नका. कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. शासनाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे पालन करावे. नागरिकांनी घरामध्ये रहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
नागरिकांना काही अडचणी, समस्या असतील महापालिकेने तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी 0241-2343622 व 0241-2340522 या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरात औषध व धूर फवारणी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post