‘कोरोना’चे गांभीर्य ओळखा; घरातून बाहेर पडून नका : प्रा.शशिकांत गाडे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
संपूर्ण जगात ‘कोरोना’ विषाणूने थैमान घातले आहे. देशातही संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक सुविधा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी राज्य शासनाकडून काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही याचे गांभीर्य ओळखून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण हाच एक मोठा उपाय असल्याने नागरिकांनी घरातून बाहेर पडून नये, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.
शहरात जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत. बंद काळात ही दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी करू नका. कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूशी लढा देण्यासाठी शासन आपल्या स्तावर उपाययोजना करत आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे शासनाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे पालन नागरिकांनी करावे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन गाडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post