अहमदनगर : विळदजवळ मुख्य पाईपलाईन फुटली


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : अमृत योजनेच्या कामांतर्गत पोकलॅन मशिनद्वारे खोदाई करतांना अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. शनिवारी (दि.७) सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान, यामुळे आज उपनगर परिसरातील काही भागात पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात रविवारी (दि.८) पाणी सोडण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत जलवाहिनेचे काम सुरू आहे. शनिवारी विळद पंपींग स्टेशनजवळ काम सुरू असतांना सकाळी पोकलॅन मशिनचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीस विलंब होत असून, रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती पूर्ण होईल, असे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद असल्याने शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, मुकुंदनगर, स्टेशन रोड, बुरूडगाव रोड परिसर व केडगाव उपनगरात पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात आज (दि.८) नेहमीच्या वेळेत पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post