एएमसी मिरर वेब टीम
पुणे : घरकाम करणाऱ्या बेली डान्सरने घर मालकाच्या घरीच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरातील कपाटात ठेवलेला आठ लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार आणि सोन्याचे सिक्के असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज नामदेव विठ्ठल चव्हाण याने लंपास केला होता. परंतु, त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जयंती वासुदेव अय्यंगार यांच्या घरी आरोपी नामदेव चव्हाण हा तीन वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून व घरातील अन्य कामांसाठी होता. शिवाय मिळालेल्या वेळेत तो आपली बेली डान्सची हौस देखील भागवत होता.

Post a Comment