एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यातील जनतेने काल पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. आता राज्यात संचारबंदी लागू करावी लागत आहे. पाचपेक्षा अधिक लोक जमता कामा नये, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी प्रसंगी कठोर पावले टाकावी लागत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री..
- प्रार्थनास्थळ बंद राहणार; फक्त पुजाऱ्यांना परवानगी
- जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा बंद
- पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे
- इमर्जन्सी असल्यास वाहन चालवण्यास मुभा
- शेती निगडीत औषधांची दुकाने सुरू
- टॅक्सी आणि रिक्षा आवश्यक कारणासाठी सुरू
- इमर्जन्सी असल्यास वाहन चालवण्यास मुभा घाबरून जाऊ नका फक्त खबरदारी घ्या
Post a Comment