‘कर्फ्यु’त अडकलेल्यांना पुरविली सुविधा; शिवसेनेचे संभाजी कदम व नगरसेवकांचा पुढाकार


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.22) ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला देशात व राज्यासह अहमदनगर शहरातही नागरिकांनी घराबाहेर न पडता उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र, बंद काळात बसस्थानके, रुग्णालयात अडकलेल्या नागरिकांना व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा देणार्‍या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसह मनपाच्या कर्मचार्‍यांना शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांकडून सुविधा पुरविण्यात आल्या.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह नगरसेवक श्याम नळकांडे, नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, राजकुमार कटारिया, अमोल बनकर, मिलिंद गुंजाळ, परवेज शेख, आकाश विधाते यांनी शहरात फिरुन बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरविणारे मनपाचे कर्मचारी, बसस्थानकांवर अडकलेले नागरिक, रस्त्याच्या कडेला आश्रय घेणार्‍या निर्वासितांना नाष्टा, पाणी व सॅनिटायझरचे वाटप केले.

Post a Comment

Previous Post Next Post