गॅस झाला स्वस्त..!


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महागाईने हैराण असलेल्या जनतेसाठी थोडा दिलासा देणारी बातमी आहे. १ मार्चपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल. दिल्लीत हाच भाव ८०५ रुपये आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर प्रथमच दरकपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या सहा महिन्यांत सहावेळा दरवाढ करण्यात आली होती. पण, त्यानंतर प्रथमच ही दरकपात करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) माहितीनुसार रविवारपासून नवीन दर लागू झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत ५३ रुपयांची दरकपात झाली आहे. तर मुंबईतही एवढीच कपात करण्यात आली आहे.

१ मार्चपासून असे असतील महानगरांमधील गॅस सिलिंडरचे दर

शहर जुने दर नवीन दर
दिल्ली 858 रु. 805 रु.
मुंबई 829 रु. 776 रु.
कोलकाता 896 रु. 839 रु.
चेन्नई 881 रु. 826 रु.

स्रोत : आयओसीएल वेबसाइट

दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सरकार देते अनुदान
सध्या केंद्र सरकार दर वर्षी १४.२ किलोच्या १२ सिलिंडरवर अनुदान देते. १२ पेक्षा अधिक सिलिंडर एका वर्षात घेणाऱ्याला पूर्ण दर द्यावा लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post