राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे 'मनसे' कौतुक


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

सरकार त्यांच्यावतीन योग्य यंत्रणा राबवत आहेत. त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. उपाययोजना करण्यास थोडासा उशीर झाला पण सरकारने योग्य पावले उचलली आहेत. याबाबत काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असे राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉक्टर, पोलिस, राज्य आणि केंद्रातील मी सरकारचे मी अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. काही मूठभर लोकांना सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही. कुठल्याही कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार कापू नयेत. हातावरचं पोट असणाऱ्यांना थोडीशी कळ सोसावी लागणार आहे. मात्र, हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने मदत करायला हवी, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. देशांतर्गत विमान सेवा बंद करण्याची गरज नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post