एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : संचार बंदीच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. नगर तालुक्यातील सर्व शाखा प्रमुखांना रक्तदात्यांची माहिती संकलित करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.
नगर तालुक्यातील सर्व गावांमधील शाखा प्रमुखांनी रक्तदात्यांची माहिती नाव व फोन नंबर स्वरूपात सोमवार पर्यंत तालुका प्रमुख यांच्याकडे जमा करावी, असे गाडे यांनी म्हटले आहे. संकलित माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कडे सादर केली जाणार आहे. त्यांच्या परवानगी नुसार आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली गावनिहाय शिबिर घेऊन रक्त पिशव्यांचे संकलन केले जाणार असल्याचे शशिकांत गाडे यांनी सांगितले.
‘कोरोना’चे गांभीर्य ओळखा; घरातून बाहेर पडून नका : प्रा.शशिकांत गाडे
Post a Comment