अहमदनगर : गुलमोहर रोड, कल्याण रोडवर महापालिकेची कारवाई; दंड वसूल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : येथील गुलमोहर रोडवर पारिजात चौकात शुक्रवारी सकाळी सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर तसेच नागरिकांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. १२ जणांकडून ६००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर 
कल्याण रोडवर सुमारे २७ जणांवर कारवाई करून १२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दक्षता नियंत्रण पथकाचे प्रमुख तथा यंत्र अभियंता परिमल निकम, गणेश लयचेट्टी, शशिकांत नजान, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, गंगाराम धोंगडे, रंगनाथ भालेराव, संजय चाबुकस्वार, बाळासाहेब पवार, गोरक्षनाथ देठे, भारत कंडारे, बाळू वाकचौरे, ऋषिकेश भालेराव, कन्हैया चावरे, विश्र्वास जगधने आदींच्या पथकाने गुलमोहर रोडवर कारवाई केली. तर आरोग्याधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, विजय बोधे आदींसह कर्मचाऱ्यांनी कल्याण रोडवर कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post